पान:संतवचनामृत.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८२] संतांची लक्षणे कुतरा भुंकत आला हिता। संती हात ठावला थां ॥ कुतन्या गळ्याची साखळी । केली संतांनी कळ ॥ एकाजनार्दनी कुतरा। दांत पाडुनी कला बे थेगा । ८०. अभक्तांस देव कंटाळतात, पण संत त्यांचा उद्धार करितात. अभक्तां देव कंटाळती । परि सरते करिती संत त्यां ॥ म्हणोनि महिमा त्यांचा जगीं। वागविती अगी सामर्थ्य ॥ आँगमानिगमांची पसारा । उगाचि भारा चिंध्यांचा ॥ वेदशास्त्रांची घोकणी । ती तो काहणी जुनाट ॥ पुरातन वाटा असती बहु । त्या त्या न घेऊ यामाजी ॥ एकाजनार्दनीं सोपा मार्ग। संतसंग चोखडा ॥ ८१. मायबाप हे जन्मास घालतात; संत हे जन्म चुकवितात. संत मायबाप म्हणतां । लाज वाटे बहु चित्ता॥ मायबाप जन्म देती । संत चुकविती जन्मपंक्ति ॥ मायबापांपरीस थोर । वेदशास्त्री हा निर्धार ॥ शरण एका जनार्दनीं । संत शोभती मुकुटमणि ॥ ८२. संतांच्या कृपेस सीमाच नाही. रवि न लपचि अंधारी । तैशी तुमची जगी थोरी॥ कृपावंत तुम्हीं संत । यावरि हेत दुजा नाहीं ॥ एकाजनार्दनी शरण । संत परिपूर्ण दयाळु । १ दंतरहित, बोचरा. २ मान्य. ४ शास्त्र. ५ वेद.