पान:संतवचनामृत.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : एकनाथ. [६७६ ७६. संतास शरण गेलें असतां ते काळाचा घाव चुकवितील. मेघापरिस उदार संत ! मनोगत पुरविती ॥ आलिया शरण मर्ने वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥ लिगाड उपाधि तोडिती । सरते करती आपणामाजी॥ काळाचा तो चुकविती घाव । येऊ न देती डाव अंगासी॥ शरण एकाजनार्दनीं । तारिले जनी मूढ सर्व ॥ ७७. संकट पडले असता त्याचे निवारण करणारा संतांवांचून दुसरा कोणी नाही. देवाचे सोइरे संत ते जाणावे । यापरते जीवें नाठवी कोणा ॥ पडतां संकट आठवितसे संतां । त्याहुनी वारिता नाही दुजा । म्हणोनि घरटी फिरे तया गांवीं। सुदर्शनादिमिरवी आयुधे हातीं। लाडिके डिंगर वैष्णव ते साचे। एकाजनार्दनीं त्यांचे वंदी पाय ॥ ____७८. संतांच्या दारीचा मी कुतराही हाईन; संतांचिये घरी होईन श्वानयाती। उच्छिष्ट ते प्रीती मिळेल मज ॥ तेणे या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥ आशापाश सर्व जातील तुटोनि । जीव हा बंधनी मुक्त होय ॥ एकाजनार्दनीं भाकीन करुणः। श्रीसंतचरणां वारवार ॥ ७९. कारण कुतऱ्याच्या गळ्यांतली सांखळी ते सोडवितील. ____संतद्वारी कुतरा जालो । प्रेमरसासी सोकलों॥ भुंकत भुंकत द्वारा आलो । ज्ञान थारुळया बैसलों॥ १ पेक्षां. २ लचांड. ३ मान्य. ४ निवारण करणारा. ५ सभोवार. ६ बालक.. ७ कु. ८ खळी. E