पान:संतवचनामृत.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. आपल्या हयातीतं इतकी प्रसिद्धी मिळविली की त्यांचे ऐशी अभंग शीख लोकांच्या ग्रंथसाहेबांत घेतले गेले; तसेंच गुजराथी भगवद्भक्त नरसी मेहता याने आपल्या संवत् १४७० मध्ये लिहिलेल्या " हरमाळा" या नावाच्या ग्रंथांतही नामदेवांचा उल्लेख केला आहे असें पंडित पांडुरंगशर्मा यांनी दाखविलेंच आहे. नामदेवांच्या अभंगांची भाषा जरी सोपी आहे, तरी तिच्यांत रा. भावे यांनी दाखविल्याप्रमाणे " वेळायितु, अनारिसा, केउता, दारवंटा, साउमा, नाथिलें, पडिपाडी, वारेमु” वगैरे ज्ञानेश्वरकालीन जुने शब्द आले आहेत हे ध्यानात ठेविले पाहिजे; याच कारणामुळे ज्ञानदेव व नामदेव हे समकालीन होते, असेही म्हणण्यास हरकत नाही. . १४. नामदेवांचे समकालीन इतर जे संत होते व ज्यांचे अभंग थोडेबहुत या पुस्तकांत घेतले आहेत त्यांचाही येथे अल्पमात्र उल्लेख केला पाहिजे. ज्याने नामदेवांच्या डोक्यावर थापटणे मारून त्यांची परीक्षा केली तो गोरा कुंभार शके ११८९ मध्ये जन्मला. तो तत्कालीन संतांत सर्वात वडील असल्याने त्यास सर्व लोक "काका" म्हणत असत. तो तेरढोकी येथे रहात असे. कीर्तनाच्य भरांत त्याने एकदा आपले मूलही पायाखाली तुडविले होते. ज्ञानदेव, नामदेव यांच्या तीर्थयात्रेच्या वेळी हा हजर होता. विसोबा खेचर हा जातीचा ब्राम्हण खरा, पण त्याचा खिस्तीचा व्यापार असे. यास परमार्थाविषयी प्रथम अश्रद्धा असल्याने ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांनी यास उपहासाने " खेचर " अशी संज्ञा दिली होती. यांचे गुरु सोपानदेव असावेत असे वाटते. हा आंवढ्या व बार्शी यांच्या दरम्यान असे. शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून देवाच्या सर्वव्यापकत्वाबद्दल याने नामदेवांची खात्री करून दिली. हाही ज्ञानदेव नामदेव यांच्या तीर्थयात्रेत होता. याने बाशी येथे श्रावण शुद्ध एकादशी शके १२३१ मध्ये देह ठविला. या संतांशी समकालीन सांवता माळी हा पंढरपूरनजीक अरणगांव येथे रहात असे. अरणगांव हें मोडनिंब स्टेशनपासून तीन मैलांवर आहे. सांवता माळ्याची बाग व विहीर अद्यापही तेथे दाखविली जातात. हाही ज्ञानदेव नामदेव यांच्या तीर्थयात्रेत होता.. याने शके १२१७ मध्ये आश्विनवद्य १४ स समाधि घेतली. त्याची समाधि फार चांगली बांधली असून तिच्यापुढेच त्याच्या एका ब्राम्हण भक्ताची समाधि आहे. याचे काही या पुस्तकांत न छापलेले असे अभंग श्रीमंत बाळासाहेब मिरजकर यांजकडे आहेत. त्यांचा द्वितीयावृत्तीत उल्लेख केला जाईल. सध्या येथें सांवता-- माळ्याच्या या इतर अभंगांपैकी एकच उद्धृत करितों: