पान:संतवचनामृत.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६.] - संतांची लक्षणे. १९१ ऐसे कैसियाने भेटती ते साधु । ज्यांचा अतयं तर्कवेना बोधु । ज्यासि निजानंदी आनंदु । ज्यांचा परमानंदी उद्बोधु ॥ पवना घालवेल पालाण | पायीं चढवेल गगन । . भूत भविष्य कळो येईल वर्तमान । परि त्या साधूचें न कळे भहिमान॥ चंद्रामृत सुखे सेववेल । रवि अस्ता जातां धरवेल । बाह्यो हेळी सागर तरवेल । परि त्या साधूची भेटी न होईल ॥ जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल निजध्यान ।। ज्ञेय शाता विवर्जित ज्ञान । ज्ञानाध्यानाचे मूळ हे साधुजन ॥ निजवृत्तीचा करवेल निरोधु । जिवाशिवाचा भोगवेल आनंदु। 'एकाजनार्दनीं निजसाधु । त्यांच्या दर्शने तुटे भवबंधु ॥ . HTTA ६०. ब्रह्मज्ञान्याची लक्षणे. वर्म जाणे तो विरळा । तयांची लक्षणे पैं सोळा । देही देव पाहे डोळां । तोचि ब्रह्मज्ञानी ॥ जन निंदो अथवा वंदो । जया नाही भेदाभेद । . विधिनिषेधांचे शब्द । अंगी न बाणती ॥ कार्य कारण कर्तव्यता। है पिस नाहीं सर्वथा । उन्मनी समाधि अवस्था । न मोडे जयाची ॥ कर्म अकर्माचा ताठौ। न बाणेचि अंगी वोर्खटा। वाउग्या त्या चेष्टा । करीना कांहीं । शरण एका जनार्दनीं । तोचि एक ब्रह्मज्ञानी। तयाचे दरुशनीं । प्राणियांसी उध्दार ॥ १ खोगीर. २ हातांनी. ३ सहज, लीलेनें. ४ वेड. ५ अभिमान. ६ वाईट.