पान:संतवचनामृत.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० [६५८ संतवचनामृत : एकनाथ. महाभागवत करुनि श्रवण । सर्वांगाचे कान केले तेणे॥ श्रीशुक आपण करूनि कीर्तन । उदारला जाण परीक्षिति ॥ हरिनामघोष गर्जे तो प्रल्हाद । स्वानंद प्रबोध जाला त्यासी ॥ स्तंभी अवतार हरि प्रगटला । दैत्य विदारिला तयालागीं॥ पायाचा महिमा स्वये जाणे रमा। प्रिय पुरुषोत्तमा जाली तेणें ॥ हरिपदांबुज सुकुमार कोवळे । तेथे करकमळे अखंडित ॥ गाईचिया मागे श्रीकृष्णपाउले। अक्रूरे घातले दंडवत ॥ करूनि वंदन घाली लोटांगण। स्वानंदें निमग्न जाला तेणे ॥ दास्यत्व मारुति अर्चे देहस्थिति। सीताशुद्धि कीर्ति केली तेणे॥ सेव्यसवक भाव जाणे तो मारुति । स्वामी सीतापति संतोषला। सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्वभावें प्रीति अर्जुनासी॥ 'उपदेशिली गीता सुखी केले पार्थी। जन्ममरणवाता खुंटविली॥ आत्मनिवेदन करूनियां बळी। जाला वनमाळी द्वारपाळ। औटै पाऊल भूमि घेऊनि दान । याचक आपण स्वयें झाला ॥ नवविधा भक्ति नवजणे केली । पूर्ण प्राप्ति जाली तयांलागीं ॥ 'एकाजनार्दनी आत्मनिवेदन । भक्ति दुजेपण उरले नाहीं॥ ४. संतांची लक्षणे. ५९. " ऐसे कैसियाने भेटती ते साधु." ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । ऐसे जाणती ते अतिदुर्गमे । तयांची भेटी जालिया भाग्य परम । १ खांब. २ साडेतीन. ३ दुसरें. ४ भिन्नजातीचं. ५ कळण्यास अतिशय कठिण.