पान:संतवचनामृत.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ संतवचनामृत : एकनाथ. [६६१. ६१. क्रोध, शोक, मोह साधूंचे मनास स्पर्शत नाहीत. आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा । क्रोधाचा थारा अंतरीं नये आपुलंच धन तस्करें नेतां जाण । जयाचें मन उद्विग्न नव्हे ॥ आपुलाचि पुत्र वधेोनि जाय शत्रु । परि मोहाचा पाझरू नेत्रीं नये॥ आपुले शरीर गांजितां परनरें । परि शांतीचे घर चळो नेदी ॥ एकाजनार्दनी जया पूर्ण बोधु । तोचि एक साधु जगामाजी ॥ ६२. निंदास्तुति मुखांत नसून संत केवळ आत्मस्थितीने वर्ततात. मुखीं नाहीं निंदास्तुति । साधु वर्ते आत्मस्थिति ॥ राग द्वेष समूळ गेले । द्वैताद्वैत हारपले ॥ घेणे देणे हा पसारा । नाहीं जयासी दुसरा॥ एकाजनार्दनीं संत । हा ज्याचे हृदयीं भगवंत ॥ ६३. संसारी आपदा असून वाचेने सदोदित विठ्ठल म्हणणारा विरळा. असोनि संसारी आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा॥ नाहीं मानसी तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥ असोनियां अकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥ एकाजनार्दनीं ऐसे थोडे । लक्षांमध्ये एक निवडे ॥ ६५. वरवर गुरुपण मिरवून काय उपयोग ? जळतिया घरा । कोण वसती करी थारा ॥ तैसे अभागी पामर । गुरुपण मिरविती वरवर ॥ नाहीं मंत्रशुध्दीचे ज्ञान । भलतियाचे फुकिती कान ॥ मनुष्य असोनि गुरूं पाही । एकाजनार्दनीं ते नाहीं ॥ १ स्त्री. २ आश्रय. ३ चोर. ४ निर्दव्य, गरीब. ५ जनावर.