पान:संतवचनामृत.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावनाः निघाला (क्र. ७.) तो प्रथम पंढरपूर, व नंतर नेथन बार्शीकडे विसोबावाच्या "दर्शनास गेला. तेथें विसोबास त्याने लिंगावर पाय ठेवून निजलेला. असतांना पाहिले. विसोबाने देवाच्या सर्वव्यापित्वाबद्दल नामदेवास उपदेश केला ( क...), व पाषाणाच्या देवानं भवव्याधि हरणार नाही असे सांगून (क्र. ९), नामदेवाच्या डोळ्याचा डोळा उघडला (क्र. १०). नामदेवास विसोबापासून जी परमार्थप्राप्ति झाली तिचा विकास ज्ञानेश्वरांच्या संगतीत झाला. नामदेवांचें व ज्ञानेश्वरांचे परस्पर अत्यंत प्रेम होते. एका प्रकारे ज्ञानदेव हे नामदेवांचे आजेगुरु होत. नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांस सोपानदेवांचा उपदेश झाला होता, व सोपानांस ज्ञानेश्वरांप्रमाणेच निवृत्तिनाथांपासून परमार्थप्राप्ति झाली होती... ज्ञानेश्वर हे ज्ञानाची मूर्ति, व नामदेव हे भक्तीची मूर्ति असल्याने त्यांच्या संयोगामुळे ज्ञान व भक्ति या दोहींसही महत्त्व चढले. ज्ञानेश्वरबारोबर नामदेव हिंदुस्थानची तीर्थे पाहण्यास गेले. त्या प्रसंगाचे अभंग त्यांनी आपल्या “ तीर्थावळी " या प्रकरणांत केले आहेत. ज्ञानेश्वरांची समाधि शके १२१८ मध्ये झाली त्या वेळी नामदेव तेथे हजर होते, • पंढरपुरास अगर पंढरपुराजवळ नाना यातीमध्ये जे महान् भगवद्भक्त होऊन गेले - त्यांचे आद्य आचार्य नामदेव हेच होत. आपणांसारखे मोठमोठे संत निर्माण करून, व त्यांच्या संगतीमध्ये अर्धशतक भक्तीचा उपभोग घेऊन, नामदेव शके १२७२ मध्ये समाधिस्थ झाले. हल्ली पंढरपुरास विठ्ठलाचे महाद्वाराजवळ जी - पायरी आहे तीच नामदेवांच्या समाधीची जागा आहे असे सांगतात. एका बाजस नामदेव व दुसऱ्या बाजूस चोखामेळा या उभयतांच्या समाधि महाद्वाराच्या वाटेवर असल्याने त्या द्वारास फार महत्त्व आले आहे हे सांगण्याचे कारण नाही. नामदेवांनी आपल्या घरांत ज्या केशिराजाची स्थापना केली, व त्यापुढे भजन केले, ती मूर्ति व तें घर अद्याप दाखविण्यांत येतें, नामदेवांसारखा भक्त झाला नसता तर पंढरीचें माहात्म्यही वाढले नसते. या भगवद्भक्त नामदेवांनी कीर्तनाचा सांप्रदाय घालून दिला, व प्रथम अभंगांची रचना केली. यांच्या अभंगांतच विष्णुदास नामा या नांवाचा जो एक ग्रंथकार शेंदोनशे वर्षांनी नामदेवानंतर होऊन गेला त्याचे अभंग मिसळलेले आहेत. तथापि प्रतिभा, भाषेचे सौंदर्य, जुनी भाषा, निकट भक्ति, वगैरे गुणांनी नामदेवांचे अभंग निवडतां येण्याजोगे आहेत. नामदेबांच्या अभंगांची खरी गाथा जगापुढे मांडणे हे एक मोठेच काम आहे, व तें काम - कोणी होतकरू व आस्थेवाईक महाराष्ट्रभाषाभक्तानें केले पाहिजे. नामदेवांनी