पान:संतवचनामृत.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४१] नामस्मरण आणि भक्ति. . १८३ ३८. या जगांत सर्व वस्तु नाशिवंत असून एक हरिनामच शाश्वत आहे. नाशिवंत धन नाशिवंत मान । नाशिवंत जाण काया सर्व ॥ . नाशिवंत देह नाशिवंत संसार । नाशिवंत विचार न करिती ॥ नाशिवंत स्त्रीपुत्रादिक बाळे । नाशिवंत बळे गळां पडती ॥ एकाजनार्दनी सर्व नाशिवंत । एकचि शाश्वत हरिनाम ॥ ३९. नामजप मनींचे सर्व हेतु पूर्ण करतो. आपुले कल्याण इच्छिणे जयांसी। तेणें या नामासी विसंबूं नये ॥ करील परिपूर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामापाशीं ॥ भुक्ति आणि मुक्ति वोळंगती सिद्धि । होईल की वृद्धी आत्मनिष्ठे॥ एकाजनार्दनी जपतां हे नाम । पुरवील काम जो जो हेतु ॥ ४०. अनुभव आल्यावर नामावरील श्रद्धा दुणावते. नाहीं जया भाव पोटीं । तया चावटी वाटे नाम ॥ परी येतां अनुभव । चुकवी हाव संसार ॥ वेरझोरीं पडे चिरी । नाहीं थारा जन्माचा॥ एकाजनार्दनी खंडे कर्म । सोपें वर्म हातां लागे। ४१. नामरूपाला मेळ न घालतां तुम्ही केवळ वाचेचा ___गोंधळ कां करितां ? नाम घेतां हे वैखरी । चित्त धांवे विषयावरी ॥ कैसे होताहे स्मरण । स्मरणामाजी विस्मरण ॥ नामरूपा नव्हता मेळ । नुसता वाचेचा गोंधळ ॥ एकाजनार्दनी छंद । बोलामाजी परमानंद ॥ १ आविनाश, सतत टिकणारें. २ आश्रयकरणे. ३ श्रद्धा. ४ व्यर्थ बडबड, ५ येणेजाणे, खेपा, जन्ममृत्यु. ६ दगड. ७ आश्रय.