पान:संतवचनामृत.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ संतवचनामृत : एकनाथ. [8 ४२ ४२. हरिनाम ऐकून तुला सुख वाटणार नाही तर तुझ्या अंतरीं पाप आहे असे समज. हरिनाम ऐकतां न वाटे सुख । अंतरीं तूं देख पाप आहे ॥ कस्तुरीचे आळांपेरिला पलांडूं। सुवास लोपोनि कैसा वाढे दुर्गधु॥ धारोष्ण पय परिज्वरिताचे मुखाधुंकोनि सांडी म्हणे कडू विख ॥ पान लागलीया गूळ न म्हणे गोडु । गोडाचे गोड ते झाले कडु ॥ एकाजनार्दनीं भाव नुपजे नरा। नरदेही आयुष्य तेंही केला मातेरी॥ ४३. नामधारक हा सर्वापेक्षा कोटिगुणाने श्रेष्ठ आहे. गांवढे सहस्र ब्राह्मण । तृप्त केलिया भोजन । पुण्यक्षेत्रींचा एकचि जाण । सुकृत तितुकेंचि जोडे । ऐसे पुण्यक्षेत्रींचे दशशतक । तृप्त केलिया पाठक। पहातां सुकृत । तितुकेंचि जोडे । ऐसे सहस्र वेदपाठक । तृप्त केलिया पंडित एक। पहातां सुकृत । तितुकेंचि जोडे । तैसेच पंडित सहस्र एक । तृप्त केलिया संन्यासी देख । तरी ते सुकृत । तितुकेंचि जोडे ॥ तैसे सहस्र संन्यासी । गणित एक परमहंसी। पहातां सुकृतासी । एक तृप्त केलिया ॥ परमहंसी सहस्रगणी । तैसीच ब्रह्मज्ञानाची मांडणी । जोडे सुकृत तृप्तकरणी । एक ब्रह्मवेत्ता॥ ऐसे वेत्ते अपरंपार । न ये नामधारकाबरोबर। नामधारका सादर । पाहे एका जनार्दनीं ॥ १ कांदा. २ ताजें. ३ सर्पदंश झाला असता. ४ नाश. ५ गांवढळ. ६ पठण करणारा.