पान:संतवचनामृत.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ संतवचनामृत: एकनाथ. [६३६ ३. नामस्मरण आणि भाक्त. ३६. " आठव तो परब्रह्म । नाठव तो भवभ्रम." भगवद्भावो सर्वांभूती । हेचि ज्ञान हेचि भक्ति । विवेक विरक्ति । याचि नांवें ॥ हे सांडूनी विषयध्यान । तेचि मुख्यत्वे अज्ञान । जीवीं जीवा बंधन । येणेचि दृढ ॥ आठव तो परब्रह्म । नाठव तो भवभ्रम । दोहींचे निजवर्म । जाण बापा ॥ आठव विसर चित्तीं । जेणे जाणिजेती। तेचि एक निश्चिती । निजरूप ॥ स्मरण ते निजमुक्ति । विस्मरण तेचि अधोगती। ऐसे पुराणे गर्जती । बाह्या उभारूनि ॥ एकाजनार्दनीं । सहज निजबोधनी। सबाह्याभ्यंतरी । पूर्ण परमानंद ॥ ३७. नामाचा उच्चार हीच भक्ति. सेवेचे कारण मुख्य तो सद्भाव।। इतर ते वाव इंद्रियबाधा ॥ साधन हेचि आधीं तोडी तूं उपाधि । नको नको ऋद्धिसिद्धि आणिक कांहीं ॥ नामाचा उच्चार मुख्य हेचि भक्ति। एकाजनार्दनीं विरक्ति तेणे जोडे । १ हात. २ आंतबाहेर. ३ व्यर्थ.