पान:संतवचनामृत.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३५] उपदेश. १८१ मनासी ते बळ । देवा तुमचे सकळ ॥ एकाजनार्दनी देवा । मन दृढ पायीं ठेवा ॥ ३४. अलक्षपुरचा जोशी सांगतो की मनामागे जाऊ नका. आम्ही अलक्षपुरचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसीं । तेणे चुकती चौयांशी । मी निर्गुणपुरींचा जोशी ॥ होरा ऐका दादांनो । होरा ऐका दादांनों ॥ध्रु०॥ नका जाऊं मनामागे । थोर थोरां जाहले दगे। मी बोलत नाहीं वाउगें। सावध रहा दादानों। वासना वाईट ही बा थोर । भुलविले लहान थोर । फिरती चौऱ्यांशी लक्ष घरे। पडाल फशी दादांनो॥ एका जनार्दनी जोशी । सांगेन शकुन सर्वत्रांसी। रामनाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनी ॥ ३५. एडक्या मदनास शुकदेवाने आणून एकाजनार्दनाचे - चरणी बांधिलें. एडका मदन । तो केवळ पंचानन ॥ध्रु०॥ धडक मारिली शंकरा। केला ब्रह्मयाचा मातेरी। इंद्रचंद्रासी दरारीं । लाविला जेणे॥ धडक मारिली नारदा। केला रावणाचा चंदा । दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण ॥ भस्मासुर मुकला प्राणांसी । तेचि गति झाली वालीसी । विश्वामित्रासारिखा ऋषी । नाडिला जेणे॥ शुकदवान ध्यान धरोनि । एडका आणिला आकळोनि । एकाजनार्दनाचे चरणीं। बांधिला जेणे ॥ १ लक्ष्यातीत परब्रह्म हेंच कोणीएक शहर. २ ज्योतिष, भावष्य, ३ व्यर्थ, ४ सिंह. ५ धक्का. ६ फजिती. ७ भीति, धाक. ८ फसवणे.