पान:संतवचनामृत.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० संतवचनामृत : एकनाथ. [६३० ३०, प्राचीनाची दोरी असेपर्यंत एखाद्या पांथस्थाप्रमाणे या संसारांत असावें. पांथस्थ घरासी आला । प्रातःकाळी उठोनि गेला ॥ तैसे असावे संसारीं । जैसी प्राचीनाची दोरी ॥ बाळी घराचार मांडिला । तो सवेचि मोडुनि गेला ॥ एका विनवी जनार्दना । ऐसें करी गा माझ्या मना ।। ३१. पक्षी अंगणांत उतरतात व सवेंच उडून जातात. पक्षी अंगणीं उतरती । ते कां गुतोनियां राहती॥ तैसे असावे संसारीं । जोवरी प्राचीनाची दोरी॥ वस्तीकर वस्ती आला । प्रातःकाळी उठोनि गेला॥ शरण एकाजनार्दन । ऐसे असतां भय कवण ॥ . ३२. “ मन म्हणे तें न करावें." वैर करुनी मन मारावें । मनाधीन पैं न व्हावें ॥ मनामागे जाऊं नये । मन आकळुनि मन पाहे ॥ मन म्हणे ते न करावे । मनीं मनासी बांधावें ॥ मन म्हणेल ते सुख । परि पाहतां अवघे दुःख ॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावे आकळून ॥ ३३. मन देवाच्या चरणी बांधून ठेविलें असतां तें इकडे तिकडे जाणार नाही. माझ्या मनाचे ते मन । चरणी ठेवावे बांधून ॥ मग ते जाऊ न शके कोठे । राहे तुमच्या नेहेटे ॥ - १ वाटसरूं. २ खेळ. ३ प्रारब्ध. ४ वाटसरूं. ५ बळाने.