पान:संतवचनामृत.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२९] उपदेश. २८. अदृष्टाचे सामर्थ्य. अधमै अदृष्टाचे चिन्ह । विपरीत वचन ते ऐका॥ भांडारी ठेविला कापूर उडे । समुद्रामाजी तारूं बुडे ॥ ठक येवोनि येकांती। मुलाम्याचे नाणे देती॥ स्वच परचक्र विरोध धाडी।खणीत लावुनि तळघरे फोडी पाणी भरे पेवा आंत । तेणे धान्य नासे समस्त ॥ गोठणी शेळ्या रोग पडे। निमती गाईम्हशीचे वाडे ॥ भूमिनिक्षेप करूं जाती। ते आपुल्याकडे धुळी वोढिती॥ बुद्धि सांगे वाडोवाड । तेथोनि तोंडी घाला दगड ॥ ऐशी कर्माची अधर्म स्थिती। एकाजनार्दनीं सोशी फजिती॥ २९. मागेपुढे कुटाकुटी । सकळांस होतसे. फूल झडे तंव फळ सेसे । तया पाठी तेही नासे॥ एका मागे एक पुढे। मरण विसरले बापुडे ॥ शेजारी निमाले कोणाचे खांदी।लपों गेला सा खादली मोंदी॥ मरण ऐकतां परता पळे । पळे तोही मसणी जळे ॥ प्रेत देखोनी वोझाच्या जाती। वोझे म्हणती तेही मरती॥ मरण म्हणतां धूं धूं म्हणती । धुंकते तोडे मसणी जळती ॥ पळे ना चळे तोचि सांपडे। जाणतां जाणतां होताती वेडे ॥ एका जनार्दनीं शरण । काळ वेळ तेथे न रिगे मरण ॥ १चोर, लुच्चा. २ खोटे. ३ आपले व परक्यांचे हल्ले. ४ हल्ला. ५ खणून. 1६ जनावरें राहण्याची जागा. ७ नष्ट होणे. ८ धरले जाते. ९ समुदाय. १० स्मशान. ११ ओझें वाहणारा.