पान:संतवचनामृत.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ संतवचनामृत : एकनाथ, तेथें धनलोभ येतां । अनर्थाचे होय " एकाजनार्दनीं । काम क्रोध लोभ तीन्ही । द्रव्यदारा त्यजोनि । नित्य तो मुक्त ॥ २५. एकाजनार्दनांत मीपण तूंपण नाही. देहबुद्धि सांडी कल्पना दंडी। वासनेची शेंडी वाढवू नको॥ तूंते तूंचि पाहीं तूंते तूंचि पाहीं। पाहुनियां राही जेथीच्या तेथे ॥ तूंते तूंचि पाहीं जेथे देहो नाहीं। मीपणे कां वायां गुंतलासी॥ एकाजनार्दनीं मीपण तूंपण । नाहीं नाहीं मज तुझीच आण ॥ २६. गजाचे ओझें गाढव वाहूं शकणार नाही. गजाचे ते वोझे गाढवासी न सोजे । भाविकाचे भजन अभाविकां न विराजे ॥ पतिव्रतेची राहाटी सिंदळीसी न साजे । श्रोत्रियाचे कर्म हिंसका लाजे ॥ एकाजनार्दनाचे कवित्व सर्वांसी साजे । वाचे श्रीगुरु म्हणतां कदा न लाजे ॥ २७. सर्व वाणी ईश्वरास सारख्याच प्रिय आहेत. वेदवाणी देवे केली । येर काय चोरापासुनी झाली ॥ सकळ वाचा वदवी देव । कां वाढवा अहंभाव ॥ ज्या ज्या वाणी स्तुति केली। ते ते देवासी पावली ॥ एकाजनार्दनीं मातु । वाचा-वाचक जगन्नाथु ॥ १ नाहीशी करणे. २ शोभणे.३ शोभणे. ४ चालणूक. ५ यज्ञ करणारे दीक्षित. ६ गोष्ट,