पान:संतवचनामृत.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२४] उपदेश. १७७ नाहीं शुद्ध कर्म योगाचा विचार । सदा परद्वार लक्षितसे ॥ ऐशिया पामरा कायसा तो बोध । एकाजनार्दनी शुद्ध खडक जैसा॥ २३. जो अठरा गुण सोडील तोच शुद्ध होय. काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्वरी तत्पर हेचि येथे ॥ . क्षुधा तृषा मोह शोक जरा मरण । षडू पूर्ण देही हेचि ॥ आशा मनीशा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे अठरागुण जाणा देहामाजीं॥ एकाजनार्दनीं त्यजोनि अठरा । तोचि संसारामाजी शुध्द ॥ २४. बीज अग्नीत पेरिले असता त्यास कोंभ कसे येतील ? करितां हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच नये दारुण । रुका वेचितां प्राण । जाऊ पाहे ।। द्रव्यदारा लोभ अंतरीं । हरिकथा वरि वरि। बीज अग्नी माझारी । विरूढे कैसे ॥ टाळी लावूनियां जाण । दृढ घालिती आसन । अंतरीं तो ध्यान । वल्लभेचें ॥ धनलोभाचा वोणवा । तेणे जाळिले जीवभावा । हरिकथेचा करी हेवा । लोकरूढी ॥ धनलोभी आसक्तता । हरिकथा करी वृथा। तयासी तो परमार्थ तत्त्वतां । न घडे जाणा ॥ एकलीच कांता । नाश करी परमार्था । .१ परस्त्री, २ इच्छा. ३ पैसा. ४ दरवाजा. ५ स्त्री. ६ वणवा. सं...१२