पान:संतवचनामृत.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६ १३ १७४ संतवचनामृत : एकनाथ. अनुतापावांचून । ब्रह्मज्ञान होय दीन ॥ एकाजनार्दनीं शरण । तैंच अनुताप बाणे पूर्ण ॥ १४. अविश्वास हा दोषांचा मुकुटमाण आहे. अविश्वासापुढे । परमार्थ कायसे बापुडें ॥ अविश्वासाची राशि । अभिमान येतसे भेटीसी ॥ सदा पोटी जो अविश्वासी । तोचि देखे गुणदोषांसी ॥ सकळदोषां मुकुटमणी । अविश्वास तोचि जनीं ॥ 'एकाजनार्दनीं विश्वास । नाहीं त्यास भय कांहीं ॥ १५. लोखंडाची बेडी तोडून सोन्याची घालून घेण्यांत ___ काय अर्थ ? लोखंडाची बेडी तोडी। आवडी सोनियाची घडी ॥ मी ब्रह्म म्हणतां अभिमान । तेथें शुद्ध नोहे ब्रह्मज्ञान ॥ जैसी देखिली जळगार । शेवटी जळाच निर्धार ॥ मुक्तपणे मोला चढले । शेवटीं सोनियाचे फांसी पडिले ॥ एकाजनार्दनी शरण । बद्धमुक्ता ऐसा शीण ॥ १६. “एक ते करूं करूं म्हणतांचि गेले." एक नरदेह नेणोनि वायां गेले । एक न ठेके म्हणोनि उपेक्षिले। एक ते गिळिले ज्ञानगर्दै ॥ एक ते साधनी ठकिले । एक ते करूं करूं म्हणतांचि गेले।। करणे राहिलेसे तैसे॥ १ पाण्याची गार. २ पाश. ३ घडणे. ४ त्यागणे. ५ फसणे.