पान:संतवचनामृत.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१३] १७३ उपदेश. २. उपदेश. १०. गोड परमार्थ कडू वाटतो हे विषयरोगाचे विचित्र. विदान नव्हे काय ? नवल रोग पडिपाडे । गोड परमार्थ झाला कडू ॥ विषयव्याधीचा उफोडा । हरिकथेचा घ्यावा काढा ॥ ऐसा रोग देखोनि गाढा । एकाजनार्दन धांवे पुढां ॥ ११. निरपेक्षता. आधी घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथां ॥ निरपेक्ष जेथे घडे । यमकाळ पायीं जोडे । निरपेक्षाची आवडी । ब्रह्मशान घाली उडी ॥ निरपेक्षेवांचून । नाहीं नाहीं रे साधन ॥ एकाजनार्दनीं शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान । है . । . १२. “ अनुताप जाहलिया सहज समाधि." अनुतापावांचुनी नाम नये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ॥ मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुद्ध तेणे ॥ अनुताप जाहलिया सहज समाधि । तुटेल उपाधि सहजचि ॥ एकाजनार्दनीं अनुतापे पाहे । मग देव आहे जवळी तया ।। १३. अनुतापाने त्रिविधताप जातील. अनुताप नाहीं ज्यासी । विवेक नुपजे मानसीं ॥ मुख्य पाविजे अनुताप। तेणें निरसे त्रिविध ताप ॥ १ थोरवी. २ जोर. ३ पश्चात्ताप, ४ दूर होणे, नाहीसे होणे.