पान:संतवचनामृत.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१९] , उपदेश. १७५ शाने व्हावी ब्रह्मप्राप्ति । ते ज्ञान वैची विषयासक्तीं। . ... भांडवल नाहीं हातीं। मा मुक्ति कैंची ॥ स्वप्नींचे निजधने । जानतीं नोहे धर्म। ब्रह्माहमस्मि हेही समाधान । सोलीव भ्रम ॥ अभिमानाचिया स्थिती। ब्रह्मादिकां पुनरावृत्ति। ऐसी वेदश्रुति । निश्चयें बोले ॥ एकाजनार्दनी एकपण अनादि ।अहं आत्मा तेथे समूळ उपाधि॥ १७. दोन साधनाखेरीज तिसरें साधन नको. हींचि दोनी पैं साधनें । साधके निरंतर साधणे ॥ परद्रव्य परनारी । यांचा विटाळ मने धरीं ॥ नको आणिक उपाय । सेवीं सद्गुरूचे पाय ॥ म्हणे एकाजनार्दन । न लगे आन ते साधन ॥ १८. जेथें अर्थ आहे तेथें परमार्थ नाही. अर्थ नाहीं जयापाशीं । असत्य स्पर्शना तयासी ॥ अर्थापाशी असत्य जाण । अर्थापाशी दंभ पूर्ण ॥ अर्थापोटीं नाहीं परमार्थ । अर्थापोटीं स्वार्थ घडतसे ॥ अर्थ नको माझे मनीं । म्हणे एकाजनार्दनीं ॥ १९. हिंगाच्या संगतीने कस्तुरीचा वास नाहीसा होत नाहीं काय? कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग जाणिजेती॥ साकरेचे आळी निंब जो पेरिला । शेवटी कडू त्याला फळे पत्रे॥ १ पुनर्जन्म. २ पैसा. ३ सुवास. ४ आ. 1