पान:संतवचनामृत.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथ १ गुरुस्तुति. १. एकनाथांची गुरुपरंपरा. जो निर्गुण निराभास । जेथून उद्भव शबल ब्रह्मास । आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वोस आदिगुरु ।। तयाचा ब्रह्मा अनुगृहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । आत्रिपाद प्रसादित । श्रीअवधून दत्तात्रय ॥ दत्तात्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा। जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगी॥ जनार्दनकृपेस्तव जाण । समूळ निरसले भवबंधन । एकाजनार्दना शरण । झाली संपूर्ण परंपरा ॥ २. एकनाथाची गुरुपूजा. मनोभाव जाणोनि माझा । सगुणरूप धरिले वोजाँ। पाहुणा सद्गुरुराजा। आला वो माय॥ प्रथम अंतःकरण जाण । चित्त शुद्ध आणि मन । चोखाळोनि आसन | स्वामीसी केले॥ अनन्य आवडीचे जळ । प्रक्षाळिले चरणकमळ । वासना समूळ । चंदन लावी॥ . अहं जाळियला धूप । सद्भाव उजळिला दीप।.. पंचप्राण हे अमूप । नैवेद्य केला ॥ रजतम सांडोनि दोन्ही । विडा दिला सत्त्वगुणी। खानुभवें रंगोनि । सुरंग दावी ॥ १ मायायुक्त. २ उपदेशित. ३ सुंदर रीतीचें. ४ उत्तम रंग.