पान:संतवचनामृत.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६] गुरुस्तुति. १७१ एकाजनार्दनीं पूजा । देवभक्त नाही दुजा। . अवघाचि सद्गुरुराजा। होवोनि ठेला॥ ३. परमार्थ साधावयास एका सद्गुरूचेच साह्य पाहिजे, साधावया परमार्था । साह्य नव्हती माता पिता॥ साह्य न होत व्याही जांवई । आपणां आपण साह्य पाहीir साह्य सद्गुरु समर्थ । तेचि करिती स्वहित। एका जनार्दनीं शरण । नोहे एकपणावांचून ॥ ४. गुरूने मला उदयअस्तावांचून प्रकाश दाखविला. अभिनव गुरूने दाखविलें । अहं सोहं माझे गिळिले ॥ प्रपंचाचे उगवोनि जाळे । केले षड्वैरियाँचे तोंड काळें। उदयो अस्ताविण प्रकाश । स्वयें देहीं दाविला भास ॥ मीपण नाही उरले । एकाजनार्दनीं मन रमले ॥ ५. जनार्दनानी मला देव दाखविला हा माझा अनुभव घ्या. साँचपणे देवा शरण पैं जाती। तया वैकुंठपति विसरेना ॥ जैसी कन्या दूरदेशी एकटी। रात्रंदिवस संकटीं घोकी मायबाप. पतिव्रतेचे सर्व मन पतिपायीं। तैसा देव ठायीं तिष्ठतसे ॥ एकाजनार्दनीं मज हा अनुभव । जनार्दने देव दाखविला ॥ ६. साधनाच्या कोणत्याही आटी न करितां जनार्दनाने माझ्या देहींच मला देव दाखविला. अभिनव सांगतां विस्मयो दाटला देहींच भासला देव माझ्या ॥ नवल कृपेचे विंदान कैसें । जनार्दन सँरसे केले मज ॥ १ कौतुक. २ सोडवणे. ३ कामकोधादिक सहा. ४ खरोखर. ५ उभा रहाणे. ६ कौतुक. ७ सारखे, बरोबर.