पान:संतवचनामृत.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ संतवचनामृत : जनार्दनस्वामी. ... [६ १७ विकासिला निर्मळ जैसा चंद्र दिसे । येताहे प्रकाशे आत्माराम॥ म्हणे जनार्दन नव्हे एकनाथा। समाधि पहातां आळस केला ॥ १६. स्वरूपदर्शनापर्यंत समाधि सोडूं नये. शिष्य म्हणे स्वामी पुढे कैसे पहावे । रिघत हे जावें अभ्यासासी॥ स्वामी म्हणे बापा समाधि घेई आतां। तुझिया विकल्पता निववीतों आशंका जे झाली तुझी तुज ठेली। आम्ही नाहीं विचारिलो समाधि तुज ॥ प्रथम विकास पहावा शुभ्रवर्ण । त्याचे पुढे चांदणे चकचकित ॥ खद्योताचे वाणी सूर्य तारागण । पुढे शोध जाण घेत जावा ॥ बैसावे निश्चळ त्याचे अनी डोळे । पहावे केवळ हसु तैसें ॥ त्यामध्ये रिघावे स्वरूप पहावें । परि समाधि ही जीवें सोडूं नये॥ जिवाचा हा शिव देहाचा कुळस्वामी। तो अविनाशखाणी प्रगटतो म्हणे जनार्दन त्या पोटी रिघावें । एकनाथा पहावे आत्मरूप॥ १७, यापुढे जो बोलेल त्यास पतन होईल. मन स्वस्थ चित्ती निश्चल मध्यरात्री। गुरुगुह्याचे एकांती रिघावे हो॥ हंसा अंगींचा डोळा विकाशुनी कमला। त्याचे मध्यस्थला हेरीत जावे ॥ चिन्मय अविनाश प्रगटती ज्योत। तोचि प्राणनाथ देहाचा हा ॥ त्यापुढे आभास दिसे नीलवर्ण। तेंचि स्वरूप जाण विराटाचें ॥ १ संशय. २ अविनाश स्वरूपाचा. ३ पाहणे,