________________
$ १५] जनार्दनस्वामींचा एकनाथास उपदेश. १६७ ..... १४. समाधीच्या तीन्ही निरनिराळ्या वेळेस निरनिराळे देखणे. उदय समाधि लागो तीन वेळ । अवघा ब्रह्मांडगोळ उदयो होतो चकामध्ये चक्र येती व्योमाकार । आदि मध्य हेर ज्योति त्याची॥ द्वितीयप्रहरी समाधि कैसी परी । गुरुपुत्रा होरी येणे रूपे ॥ प्रथम समाधि निबिड सर्पाकार । त्यामध्ये आकार चक्राचे ते ॥ झळकती माणिक दिव्य रत्नखाणी । अविनाश देखणी चिन्मयाची उदयाची ज्योति द्वितीयेचा मणि । ही दोन्ही देखणी झाली बापा उदयाच्या तीन द्वितीयेच्या तीन । आविनाश देखणे संध्याकाळी॥ संध्याकाळी संदेह टाकुनियां द्यावें । त्याचेनि पैं ध्यावे समाधिसुख एक चक्र येती आकाशाएवढी । त्यामध्ये चौकडी मोतियांची ॥ भणियाचीज्योति संध्याकाळीजे वानितीतेलाविण दीप्तिपाजळल्या जनार्दन म्हणे एकनाथा घेई । सोहं याचि देहीं समाधिसुख ॥ १५. कानडोळे धरतांच आदित्याचे उमाळे पाहणे हे __ समाधीच्या अपूर्णत्वाचे चिन्ह होय. . देहाची समाधि लागे तीन वेळां। आपुली जीवनकळा शोधावी हे। कर्णी घालूनियां बाटें अंगुळ्या नेत्रांत निकटे । तेणे विकाशुनि भेटे शुभ्रवर्ण ॥ तयाचे हे नाम बिंब जीवदशा । तेणे स्वरूप दिशा भरुनि येती ॥ तितक्यामध्ये न सोडावी समाधि । त्याचेपुढे शोधी गुरुपुत्रा॥ स्वामीने पुसिलें कैसे काय झालें। कैसे तुज भासले आत्मरूप ॥ शिष्य म्हणे स्वामी धरितां कान डोळे । एकाएकी उमाळे आदि त्याचे ॥ १ पहा. २ पंक्ति, ओळ. ।