पान:संतवचनामृत.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जनार्दनस्वामींचा अनुभव. जन्ममरणाची खंत । कैसी आतां वाटेल ॥ संसारी मी दुखावलो । त्रिविधता मी पोळलों। दुःखी होऊनियां आलो। औदुंबरी या ठाया । आंकलखोप कृष्णातीरीं । गुरु वसती औदुंबरी। भक्तवत्सल तारी तारी। म्हणऊनि चरण वंदिले॥ जनार्दन पापरासी । करुनि आलो तुजपासी। तारिसील या भरंवसी । धरणे घेतले दारांत ॥ ३. " तरी आम्ही कोठे जावें । कवण्या देवा आराधावें ?" नरहरि गुरुराया। दीनबंधु सखया। करिसी दासां अंतराया। काय वाटे बडिवार। निशिदिनी हाका। वियोगाने वाढे शोका। निराश वाटे सेवका। निद्रा आली तुज काय॥ किंवा कोठे गुंतलासी। किंवा येथूनि गेलासी। काय आम्ही पापराशी । म्हणउनि लपसी गुरुराया ॥ तरि आम्ही कोठे जावें । कवण्या देवा आराधावें। दत्ता कृपावंता अवघे । शून्याकार त्रैलोक्य | गुरो मौन त्वां धरिलें । आम्हां दुःखाने व्यापिलें। जनार्दनास आवरिले । नाहीं सद्गुरु दीनबंधु ॥' ४. आता तुमच्या पायांवाचून मी काहीच जाणत नाही. आतां गुरुराया परिसा विज्ञापना । दासाची करुणा येऊ द्यावी ॥ नेणोनियां सोय फिरलो दिशा दाहीं । झाले दुःख देही बहुसाल॥ तुमची ब्रिावळी पतितपावन । कीर्ति हे ऐकोन शरण आलो । १ डौल. २ अतिशय. ३ प्रतिज्ञ, शोभा.