पान:संतवचनामृत.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जनार्दनस्वामी. १ जनार्दनस्वामींचा अनुभव. १. औदुंबरवासी गुरूंच्या ध्यानाचे वर्णन. अनंत निर्गुण सर्वांठायौं पूर्ण । न करी निर्वाण दासालागीं ॥ हांके बरोबरी धांवोनि सत्वरौं । भक्तालागीं तारी गुरुनाथ ॥ सुंदर ते ध्यान वसे औदुंबरीं । व्याघ्रचर्मधारी शोभतसे ॥ काषायें अंबर दंडकमंडलु । डमरु त्रिशूलु शंखचक्र ॥ किरीट कुंडले रुद्राक्षांच्या माळा । वैजयंती गळां हार रुळे ॥ सूर्यचंद्र नेत्र शेषफणी चक्र । पीतांबर वस्त्र परिधान ॥ गुरुचरणीं सर्व तीर्थाची मिरासी । म्हणोनि जगासी उद्धरिती॥ जनार्दन म्हणे न लगे ब्रह्मज्ञान । गुरुचरणीं मन राहो सदा ॥ 17 २. पापराशीतून तारण्याची जनार्दनस्वामींनी केलेली गुरूची याचना. जन्मा आलो मी संसारीं । सखी मानिली अंतुरीं । निंदा केली द्विजवरी । कैसा सद्गुरु जोडेल ॥ नाहीं पूजिलें गुरुवरा । नाहीं नमिले द्विजवरां । नाही केले भजन सारा । कैसा भव हा आटेल ॥ जालो परधर्मी रत । अधर्म करितां वाटे हित । १ नाश. २ कातडे. ३ भगवे. ४ हालणे. ५ हक्काची जागा.. HTTTTTTA