पान:संतवचनामृत.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - १६४ संतवचनामृत : जनार्दनस्वामो. [६४ माझा मायबाप गणगोत बंधु । तूंचि कृपासिंधु गुरुराया ॥ आतां कांहीं नेणे तुमच्या पायांविणे। संसाराचे पेणे दूर केले ॥ . जोडोनियां हात शिर पायांवरी। ठेविले निर्धारी जनार्दने ॥ ५. तूं लवकर भेट देऊन माझे प्राण वाचविण्याचे यश घे. गुरुसख्या तुजविण । जाऊ पाहे माझा प्राण ॥ कांहो कठिण केलें मन । पाहे नेत्र उघडून ॥ माता पिता म्हणविलें । तरि का निर्वाण मांडिले ॥ आतां यावे लवकरी । भेट द्यावी बा सत्वरीं ॥ यश घेई गुरुराया। जनार्दन ठेवीं पायां ॥ - - ६. गुरुयात्रेस जाऊन अगर चरित्र वाचूनही भवाचे निर्मूलन - होईल. धन्य कृष्णातीर धन्य औदुंबर । जेथे गुरुवर वसतसे ॥ धन्य तेचि नर येती जे यात्रेसी । दर्शनमात्रे त्यांसी मोक्ष जोडे । अनंत जन्माची पातकें संचित । नुरती किंचित् तीर्थ घेतां ॥ वाचितां चरित्र सद्गुरु स्वामीचें । निर्मूलन भवाचे सत्य होय ॥ नामस्मरण ज्याच्या सद्गुरुचि होणे।व्यर्थ चिंतावाहणे संसाराची गुरु गीती गावा भावे चित्तीं ध्यावा । सगुण पहावा डोळेभरी। जनार्दन म्हणे तीर्थ त्याचे पासी।चारीमुक्ति दासी होती त्याच्या ॥ १ नातेवाईक. २ मुक्काम. ३ अंत पाहणे. ४ उरत नाहीत.