पान:संतवचनामृत.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० संतवचनामृत : भानुदास. नित्यता दिवाळी नित्यता दसरा । पाहतां साजिरा विठ्ठलदेव ॥ भानुदास म्हणे विश्रांतीचे स्थान । विठ्ठल निधान सांपडले ॥ ४. भानुदासास सुळावर देण्यास नल असतां तो देवाचें चिंतन करितो. राये कंठमाळ देवासी घातली । देवे त्या दिधली भानुदासा ॥ कोणी नेली माळ करती त्याचा शोध । देखिली प्रसिद्ध याचे गळां॥ राजदूतीं नेला म्हणती गे हा चोर । रायाने विचार नाही केला। शूळी हावया भानुदास नेला । तेणे आठविला पांडुरंग ॥ ५. माझा प्राण कंठांत आला असल्याने तूं आतां अंत पाहूं नकोस. देवा कोठवरी अंत पाहतोसी । प्राण कंठापाशी ठेवियेला ॥ पळमात्र चित्ता नाहीं समाधान । चिंतेने व्यापून घेतलेसे ॥ नानापरीचे दुःख येवोनि आदळत।शोके व्याकुळ चित्त होत असे ।। यासी तो उपाय न कळेचि मज । शरण आलो तुज देवराया। इच्छा पुरवूनि सुखरूप ठेवीं । भानुदास पायीं ठाव मागे॥ ६. वर आकाश तुटून पडले तरी मी तुझीच वाट पाहीन. जरि आकाश वर पडों पाहे । ब्रह्मगोळे भंगा जाये। वडवानळ त्रिभुवन खाय। तरी तुझीच वाट पाहे गा विठोबा ॥ न करी आणिकाचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥ध्रु.॥ सप्तसागर एकवट होती। जै हे विरुनी जाय क्षिती। १ सुंदर. २ ठेवा. ३ ब्रह्मांड. ४ समुद्राच्या पोटांत राहून समुद्राचे पाणी जाळून टाकणारा अमि. ५ आंकत. ६ पृथ्वी.