पान:संतवचनामृत.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भानुदास. १. आमच्या कुळांत पंढरीच्या विठ्ठलाचे नाम घेणे इतकाच नेम आहे. आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठ्ठलाचें ॥ न कळे आचार न कळे विचार । न कळे वेव्हार प्रपंचाचा ॥ असों भलते ठायीं जपूं नामावळी ! कर्माकर्मा होळी होय तेणें ॥ भानुदास म्हणे उपदेश आम्हां । जोडिला परमात्मा श्रीराम हा॥ २. पंढरपूर ही नीळांमाणिकांची खाणी कितीहि लुटली तरी ... आगरांत जशीच्या तशीच शिल्लक आहे. माणिकाचे तारूं चंद्रभागे आले। भूषण ते जाले सनकादिकां ॥ पंढरपुर हे नीळियाची खाणी । नवलाव साजणी देखियेला ॥ अवघिया देशांसी न्यावया पुरले। आगरी उरलें जैसे तैसें। भानुदास म्हणे नीळ हा चोखडा। सुजडु हा जडां जीवनमुद्रा।। ____३. उन्मनी समाधि मनास नाठवून विठोबास पाहणे यांतच सुख वाटते. उन्मनी समाधि नाठवे मनासी । पाहतां विठोबासी सुख बहु ॥ मानंदी आनंद अवघा परमानंद । आनंदाचा कंद विठोबा दिसे।। 'जाग्रती स्वम सुषुप्ति नाठवे । पाहतां सांठवे रूप मनीं ॥ १ मैत्रीण. २ खाण, खजिना. ३ जडलेला, शोभायमान. ४ अज्ञानी जीव. ५ जीवनकला.