पान:संतवचनामृत.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कान्होपात्रा. १. विषयाच्या संगतीने इंद्रचंद्रांची कोण गति झाली? विषयाचे संगती । नाश पावले निश्चितीं। भगे पडली इंद्राला । भस्मासुर भस्म झाला। चंद्रा लागला कलंक । गुरुपत्नीसी रतला देख ॥ रावण मुकला प्राणांसी। कान्होपात्रा म्हणे दासी॥ २. तुझ्या चरणापाशी ठाव दे इतकेच कान्होपात्रा दासी. विठ्ठलाजवळ मागते. दीन पतित अन्यायी। शरण आल्ये विठाबाई ॥ मी तो आहे यातिहीन । नकळे कांहीं आचरण मज अधिकार नाहीं। भेटी देई विठाबाई ॥ ठाव देई चरणापाशीं । तुझी कान्होपात्रा दासी॥ ३. तुझी म्हणवीत असतां दुसऱ्याचा अंगसंग झाल्यास त्यांत उणेपणा कोणाकडे ? पतितपावन म्हणविसी आधीं । तरी को उपाधि भक्तांमागे ॥ तुझे म्हणवितां दुजे अंगसंग । उणेपणा सांग कोणाकडे ॥ सिंहाचें भौतुक जंबुक मैं नेतां । थोराचिया माथां लाज वाटे॥ म्हणे कान्होपात्रा देहसमर्पणे । करावे जतन ब्रीदासाठी॥ १ पामर. २ खाद्य, खाऊ. ३ कोल्हा.