पान:संतवचनामृत.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ संतवचनामृत : कान्होपात्रा. तवचनामृत: कान्होपात्रा. [६४ ४. जन्मोजन्मी विठ्ठलचरण पहावयास मिळाले तर आनंदाने मी जन्म घेईन. जन्मांतरीचे सुकृत आजी फळासी आले। म्हणोनि दाखिले विठ्ठलचरण ॥ धन्य भाग आजि डोळियां लाधले। म्हणोनि देखिले विठ्ठलचरण ॥ धन्य चरण माझे या पंथी चालिले। म्हणोनि देखिले विठ्ठलचरण ॥ येउनियां देहासी धन्य झालें। म्हणुनि देखिल विठ्ठलचरण ॥ घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे । जन्मोजन्मी देखेन विठ्ठलचरण ॥ ५. नष्ट दुराचायांचा उद्धार करणाऱ्या नामाची माळा ___ कान्होपात्रा गळ्यांत घालते. ज्याचे घेतां मुखीं नाम । धाकी पडे काळ यम ॥ ऐशी नामाची थोरी । उद्धरिले दुराचारी ॥ नष्ट गणिका अजामेळ । वाल्मिकी झाला तो सोज्वळ ॥ ऐशी नाममाळा । कान्होपात्रा ल्याली गळां ॥ HEASTIVi+ १ पुण्य. २ शुद्ध, पवित्र. ३ धारण करणे, घालणे.