पान:संतवचनामृत.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - १५४ संतवचनामृत : सेनान्हावी. [६११ ११. सेना परमार्थामध्ये सुद्धा न्हावीच आहे. आम्हीं वारिक वारिक । करूं हजामत बारीक ॥ विवेक दर्पण अयना दावू । वैराग्य चिमटा हालवू ॥ उदक शांति डोई घोलूं। अहंकाराची शेंडी पिलूं॥ भावार्थाच्या बगला झाडूं। काम क्रोध नखे काढूं। चौंवर्णो देउनि हात । सेना राहिला निवांत ॥ १२. पांडुरंग बोलावीत आहे असें सेना सांगतो. करितो विनवणी । हात जोडूनियां दोन्ही ॥ हेचि द्यावे मज दान । करा हरीचें चिंतन ॥ जातो सांगूनियां मात । पांडुरंग बोलावित॥ सोडा द्वादशी पारणे । सुखे करावे कीर्तन ॥ दिवस माध्यान्हीं आला। सेना वैकुंठासी गेला ।' १३. श्रावण वद्य द्वादशी दिवशी सेना समाप्त झाला. माझे झाले स्वहित । तुम्हां सांगतो निश्चित ॥ करा हरीचे चिंतन। गावे उत्तम हे गुण ॥ श्रावण वद्य द्वादशी। सेना समाप्त त्या दिवशी . . . - १ आरसा. २ गोष्ट.