पान:संतवचनामृत.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२७] संतांस देवाचें साह्य. १४९ २४. जनाबाईच्या मागे जाऊन देव तिचे धुणे धुतो. धुणे घेउनी काखेसीं । जनी गेली उपवासी ॥ मागे विठ्ठल धांवला । म्हणे का टाकिले मला ॥ कांगा धांवोनि आलासी। जाय जाय राऊळासी ॥ चहूं हाती धुणे केले। जनी म्हणे बरे झाले ॥ २५. जनीने झाडलोट केली तर चक्रपाणी केर भरितो. झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ।। पाटी घेउनीयां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी॥ ऐसा भक्तीसी भूलला । नीच कामे करूं लागला ॥ जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊं तुला ॥ ____२६. देवाने संतांस कसे साह्य केलें आहे? द्रौपदीकारणे । पाठीराखा नारायण ॥ गोरा कुंभाराच्या संगें। चिखल तुडवू लागे अंगे। कबिराच्या बैलोनि पाठीं। शेले विणितां सांगे गोष्टी॥ चोखामेळ्यासाठी। ढोरे ओढी जगजेठी ॥ जनीसंगे दडूं लागे। सुरवर म्हणती धन्य भाग्य ॥ २७. चोखामेळा देवास आपल्या भक्तीने भुलवितो. चोखामेळा संत भला। तेणे देव भुलविला ॥ भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकीं॥ १ देऊळ. २ रक्षण करणारा. ३ देवश्रेष्ठ.