पान:संतवचनामृत.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ [६२. __संतवचनामृत : जनाबाई. नवल वर्तले नवल वर्तले नवल चोजवेना। डोहामाजी मासोळीने वाचविले जीवना॥ नवल वर्तले नवल वर्तले अनाम चक्रपाणी। गोकुळ चोरुनि नेले तेथे कैंची दासी जनी॥ २१. माझ्या मनांत जें जें होतें तें तें देवाने पुरविलें. माझे मनी जे जे होते । ते ते दिधले अनंते ॥ देह नेऊनि विदेही केले । शांति देऊनि मीपण नेले। मूळ हे दिले क्रोधाचें । ठाणे केले विवेकाचें ॥ निजपदी दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ॥ २२. द्वारांत उभ्या असलेल्या विठ्ठलास जनी पाहते. श्रीमूर्ति असे विंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥ धन्य माझा इहजन्म । हृदई विठोबाचे नाम ॥ तृष्णा आणि आशा । पळोनि गेल्या दाही दिशा॥ नामा म्हणे जनी पाहे । द्वारी विठल उभा आहे॥ ___ २३. मी देव खाते, देव पिते. देव खाते देव पिते । देवावरि मी निजते ॥ देव देते देव घेते । देवासवे व्यवहारिते॥ देव येथे देव तेथे । देवाविण नाहीं रिते ॥ जनी म्हणे विठाबाई । भरुनी उरले अंतरबाहीं॥ १ समजेना. २ पाणी..