पान:संतवचनामृत.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० संतवचनामृत : जनाबाई. [६२७ चोखामेळ्याची करणी। तेणे देव केला ऋणी॥ लागा विठ्ठलचरणीं । म्हणे नामयाची जनी॥ २८. देव आणि संत दोन काय ? आम्ही आणि संत संत आणि आम्हीं। सूर्य आणि रश्मि काय दोन॥ दीप आणि सारंगसारंग आणि दपि। ध्यान आणि जप काय दोन॥ शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांति।समाधान तृप्ति काय दोन रोग आणि व्याधि व्याधि आणि रोग। देह आणि अंग काय दोन॥ कान आणि श्रोत्र श्रोत्र आणि कान । यश आणि मान काय दोन॥ देव आणि संत संत आणि देव । म्हणे जनी भाव एक ऐसा॥ .. २९. जो संत आणि देव निराळे मानितो त्याचा विटाळ रजस्वलाही मानितो. संत आणि देव मानी जो वेगळे । तेणे येथे आगळे केले दोष ॥ माता ते वेगळी कुचं ते उरींचे । म्हणोनियां त्यांचे मर्दन करी ॥ पाप ते वेगळे पुण्य ते आगळे । म्हणोनि गरळ पितो मद ॥ तयाचा विटाळ वाहे रजस्वला । म्हणे जनी चांडाळा बोलावूनका। ३०. ज्याचा हरि सखा झाला त्यास सर्व विश्वही साह्य करते. ज्याचा सखा हरी । त्यावरि विश्व कृपा करी॥ उणे पडो नेदी त्याचे । वारे सोसी आघांताचें ॥ तयावीण क्षणभरी। कदा आपण नव्हे दुरी॥ अंगा आपुले ओढोनि । त्याला राखे जो निर्वाणीं ॥ ऐसा अंकित भक्तांसी । म्हणे नामयाची दासी॥ १ सहा रंग. २ अधिक. ३ स्तन .४ विष. ५ मानणे. ६ विटाळशी. ७ धक्का. ८ संकट.