पान:संतवचनामृत.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४७ $२० ] साक्षात्कार. १७. स्वरूपाचा पूर डोळ्यांवर आल्याने डोळे झांकुळतात. नित्य हाताने वारावे। हृदय अंतरीं प्रेरित जावें ॥ ऐसा स्वरूपाचा पूर । आला असे नेत्रांवर ॥ स्वरूपाचा पूर आला । पाहतां डोळा झांकुळला ॥ जनी म्हणे ऐसा पूर। पाहे तोचि रघुवीर ॥ १८. तुला पाहतांच माझा शीण गेला. माझा शीणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला ॥ पाप ताप जाती । तुझे नाम ज्याचे चित्ती । अखंडित नामस्मरण । बाबूं न शके तया विन्न । जनी म्हणे हरिहर । भजतां वैकुंठी त्या घर ॥ १९. देहभाव गेल्यावर विदेहसुखाची प्राप्ति. देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय ॥ तया निद्रे जे पहुडैले । भवजागृती नाही आले ॥ ऐसी विश्रांति लाधली। आनंदकळा संचरली। त्या ऐक्यों एक होतां । दासी जनी कैंची आतां ॥ _____२०. " नवल वर्तलें, नवल वर्तले." नवल वर्तले नवल वर्तले नवल गुरुचे पायीं। कापुर जळुनि गेला तेथे काजळी उरली नाहीं॥ साखर पेरुनि ऊंस काढिला कान झाला डोळा। निबर बायको भ्रतार तान्हा सासरा तो भोळा ।। ) झांकणे, चकित होणे. २ श्रम. ३ निजले. ४ मोठी, वृद्ध..