पान:संतवचनामृत.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ संतवचनामृत : जनाबाई. [१३ उर्वशून्य श्वतवर्ण । मध्यशून्य श्यामवर्ण ॥ महाशून्य वर्ण नाळ । त्यति स्वरूप केवळ ॥ अनुहातघंटा श्रवणीं । ऐकुनि विस्मय जाहली जनी ।। १४. चारी वाचेपलीकडच्या सोहंज्योतीचा नवलाव. जोत पहा झमकली । काय सांगू त्याची बोली ॥ प्रवृत्ति निवृति दोघीजणी । लीन होती त्याच्या चरणीं ॥ परा पश्यंती मध्यमा । वैखरेची झाली सीमा ।। चार वाचा कुंठित जाहाली । सोहंज्योति उभारली॥ जोत परब्रह्मीं जाणा । जनी म्हणे निरंजना॥ १५. त्रिकूट शिखरावर भ्रमरगुंफेत जनीने देवाचे दर्शन घेतले. रक्तवर्ण त्रिकूट स्नान । श्रीहाट पाहे श्वेतवर्ण ॥ श्यामवर्ण ते गोलाट । नीळबिंदु और्टपीठ ॥ वरि भ्रमरगुंफा पाहे । दशमद्वारी गुरु आहे ॥ नवद्वारांत भेदुनी । दशमद्वारी गेली जनी ॥ १६. वामसव्य, अधोल, चराचरी, देवाचे दर्शन. वामसव्य दोहींकडे । देखू कृष्णाचे रूपडे ॥ आतां खाली पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरि ॥ चराचरी जे जे दिसे। ते ते अविद्याचि नासे ॥ माझे नाठवे मीपण । तेथे कैंचे दुजेपण ॥ सर्वोठायीं पूर्णकळा । दासी जनी पाहे डोळां ॥ १ पांढऱ्या रंगाचें. २ चमकली. ३ रजोगुणात्मक चक्र. ४ सत्वगुणात्मक चक्र. ५ तमोगुणात्मक चक्र. ६ अर्धमात्रात्मक ब्रह्मरंध्रचक्र. ७ डावी उजवीकडे. H