पान:संतवचनामृत.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Jichoda संतवचनामृत. भेदा" (६२), या व इतर पासष्टीतील ओंव्यांवरून तिचे ज्ञानेश्वरी अगर अमृतानुभव यांशी किती सादृश्य आहे हे सहज दिसून येईल. जवळजवळ पासष्टीतील प्रत्येक ओंवीस ज्ञानेश्वरी अगर अमृतानुभव यांमधून समानार्थक ओंवी काढून दाखवितां येईल असे म्हटले असतां अतिशयोक्ति होणार नाही. ज्या वटेश्वराचा उल्लेख चांगदेवपासष्टीतही आहे.व चांगदेवाच्या अभंगांतही आहे (क्र. १, २, ४, ५, ८, ९, १०.) तो वटेश्वर म्हणजे चांगदेवाचे उपास्य देवत असले पाहिजे असे दिसते. मुक्ताबाईंनी उपदेश दिला, तरी चांगदेवांनी आपले उपास्य दैवत वटेश्वरच ठेविलें होते असे दिसते. वटेश्वर हे नांव वाटीच्या आकारावरून त्या देवास पडले असावे असें म्हणतात..... ११. मुक्ताबाईनी चांगदेवास दिलेल्या उपदेशांत “ उलट उलट माघारा प्राण्या " अशा आरंभाचे एक उत्तम पद आहे. ज्ञानेश्वरांनी जशी मायानदीची कल्पना केली, त्याप्रमाणेच मुक्ताबाईनी या संसारास नदीची उपमा देऊन “ उलट उलट" असा चांगदेवास उपदेश केला आहे. हे भवनदीचें. पाणी फार ओढणारें असल्याने मोठमोठ्या पोहणान्यांस सुद्धा तें खाली पाडते असे त्यांनी म्हटले आहे (. ७.). अहंकाररूप घोंगड्याचा त्याग करून तूं आतां गुरूपदेशाप्रमाणे वटेश्वराचें ध्यान कर, असें मुक्ताबाई चांगदेवास सांगितात (क्र. ८.). गुणातीत फांदीवर पाळणा लाविला, व तेथे मुक्ताबाईंचा सुत पहुडला; मुक्ताबाईंनी अनाहताचा हूलर वाजवून त्यास उन्मनीरूप. निद्रेत निजविलें, असें. मुक्ताबाई म्हणतात (क. १०). सोऽहं सोऽहं हाच छंद धर, व जागृति व निद्रा याच्या पलीकडच्या स्थितीत म्हणजे समाधीत सुखोपभोग घे, असे मुक्ताबाईंनी चांगदेवास सांगितले आहे ( क्र. ११). नोवरीच्या पोटासच नोवरा आला, आणि नोवरा जमल्यावर त्याने नोवरी पाहिलीच. नाही, असा तो नोवरा कोणासच सांपडत नाही, असे मुक्ताबाई म्हणतात (क्र. १२.) चांगदेवांचे जे अभंग उपलब्ध आहेत, त्यांत त्यांनी मुक्ताबाईंचा मोठ्या गोरवाने उल्लेख केला आहे. वटेश्वर चांग्यास मुकाईने पोसण्यास घेतलें असें चांगदेव म्हणतात (क. १.), ज्यावेळेस चांगदेव तयार होऊन शांतिनोवरीशी लग्न लावावयास गेले त्यावेळी मुक्ताईकरवलीने हळद वाटली असे ते म्हणतात (क्र. 3.). हे लग्न म्हणजे आत्मा. बकुडी यांमधील लाच होय (क्र.४). ज्याची - नोवरी त्याच्या हातात दिल्याने मी नियंत झालो असें ज्याप्रमाणे कण्वऋषींनी शकुंतलेस दुष्यंताकडे पाठविलें