पान:संतवचनामृत.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. त्यावेळेस म्हटले, त्याप्रमाणेच आतां चांगदेवही म्हणतात (क. ५). मार्ग मुक्ताबाईंनी उपमा दिल्यांप्रमाणे चांगदेवांनीही मुंगीने जाऊन आकाशास गवसणी घातली, व तेथें एक असे मोठे नवल वर्तले की, मुरकुटानें विश्व व्यापून टाकिलें असें म्हटलं आहे. (क्र. ५). माझ्या डोळ्यांस फार उत्कंठा झाल्याने ते निडारले असतां डोळ्यांवांचन मी स्वस्वरूप भोगिलें असें चांगदेव म्हणतात (क्र..); व शेवटल्या एका अभंगांत (क. १०) यंत्रांतून ज्याप्रमाणे शब्द निघतो त्याप्रमाणे शब्द निघतात, पण डोळ्यांस देव दिसत नाहीं; नेहमी रुणझुण रुणझुण किनरी वाजते, व याच आनंदांत चांगदेव निमून जातात, असे त्यांनी लिहिले आहे........ ... - नागोवा नामदेवादि संत. . ..... . . . . . १२. ज्ञानेश्वरांचे समकालीन पण त्यांच्या पश्चात् सरासरी अर्धशतक राहून ज्यांनी विठ्ठलसांप्रदाय वाढविला अशा महान् भगवद्गत नामदेवांचे चरित्र समजण्यास थोडाबहुत मागचा पंढरीसांप्रदायाचा इतिहास पाहिला पाहिजे.' पंढरीसांप्रदायाचा उगम केव्हां झाला व त्या सांप्रदायाचा आयमुनि पुंडलीक हा केव्हाँ होऊन गेला याबद्दल अद्याप निश्चितरीतीने लिहिता येण्याजोगें नाही. पुंडलीक हा कानडी भक्त असावा असे दिसते. व पंढरपुरास विठोबाची स्थापना त्याच्या हातून झाली असावी असेंही दिसते.. ही विठ्ठलस्थापना झाल्यावर विठ्ठलाची भक्ति हळू हळू महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, गुजराथ वगरेकडेही पसरली. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या अगोदर ६६ वर्षे म्हणजे शके १.१३१ मध्ये प्रत्यक्ष आळंदी येथेच झालेल्या एका कृण्णस्वामींच्या समाधीवर विठ्ठलरखुमाईच्या मूर्ति आहेत ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. यावरून असे दिसते की विठ्ठलभक्ति ज्ञानेश्वरांच्या अगोदरच आळंदीपर्यंतही पसरली होती. तदनंतरचा आणखी एक महत्त्वाचा शिलालेख म्हटला म्हणजे शके ११५९ मधील पंढरपूरच्या देवालयांतील होय. त्यांत सोमेश्वर या नांवाच्या राजाने भीमरथीच्या तीरावर पंडरगे नामक ग्रामांत तळ दिला होता, व त्यावेळी "पुंडलिकाचें मुनि म्हणून लोक प्रेमपूर्वक चिंतन करीत होते असे लिहिले आहे. त्यानंतर शके ११९५ मध्ये म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या अगोदर दोनच वर्ष पंढरपुरामध्ये विठोबाच्या देवळांतच चौन्यांशींचा शिलालेख कोरण्यांत आला. हा शिलालेख कोरण्याचे काम शके ११९५ पासून शके ११९९ पर्यंत चालले होते. त्यांत विठ्ठलाच्या देवळाचा जीर्णोद्धार करण्याच्या कामांत ज्यांनी ज्यांनी मदत