पान:संतवचनामृत.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चांगदेवाचे गर्वहरणाः होऊन हठयोग सोडून परमार्थसाक्षात्कार व्हावा या हेतूनें ज्या वेळेस तो चारी भावंडांस शरण गेला. त्या वेळेस ज्ञानेश्वरांनी मुक्ताईकडून त्यासः उपदेश देवविला. हठयोगापेक्षां साक्षात्कार श्रेष्ठ आहे अशी ज्यावेळी चांग-देवाची खात्री पटली त्यावेळी त्यांनी पुढील अभंग केला आहे: - मातियाचे पाणी रांजण भरिला । पोट भरुनी प्याला ज्ञानदेव । अनाची साउली धरोनिया हाती । गेलासे एकांती निवृत्तिदेव ॥ पुष्पाचा परिमळ वेगळा काढिला । हार तो लेइला सोपानदेव ।।. हिन्यांचिया घुगऱ्या जेवण जेवली । पोट भरुनी धाली मुक्ताबाई ॥ चौघांचे वर्म आले असे हातां । चांगदेव स्वतां तये ठायीं ॥ या अभंगावरून चौघांचेही वर्म आपणांस प्राप्त झाले असें चांगदेवांनी लिहिले आहे. आतां ज्ञानेश्वरांनी चांगदेवपासष्टी या नांवाचे जे पत्र चांगदेवास पाठविलें न्यायठ्ठल अलीकडे रा. चांदोरकर यांनी त्याचा कर्ता ज्ञानेश्वर नसून चक्रपाणि . बांगा हा आहे असे म्हटले आहे. या चक्रपाणि चांग्याचा उल्लेख पासष्टीत आला असून त्याने आपला गुरु वटेश चांगा यांस पासष्टीत नमनहीं केलें आहे असें चांदोरकर यांचे म्हणणे आहे. शिवाय चांदोरकर असेंही म्हणतात की, हा चक्रपाणि म्हणजे प्रसिद्ध महानुभाव चक्रधरच होय. हे मत खरे मानिल्यास चांगदेवपासष्टीचे कर्तृत्व ज्ञानेश्वरांकडे येतच नाही. या मताविरुद्ध इतकेच म्हणावयाचे आहे की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी व अमृतानुभव एका बाजूस व अभंग दुसऱ्या बाजूस ठेवून पाहिले असता त्यांच्या भाषासादृश्यामुळे व विचारसादृश्यामुळे त्यांचे कर्तृत्व एकाच व्यक्तीकडे येते, असे सिद्ध करितां येते, त्याप्रमाणेच ज्ञानेश्वरी व अमृतानुभव एका बाजूस ठेवून दुसन्या बाजूस चांगदेवपासष्टी ठेविली असता त्यांमध्येही भाषासादृश्य व विचारसादृश्य इतके आहे की त्या सर्वांचे कर्तृत्व एकाच व्यक्तीकडे येतें असे म्हणण्यास हरकत नाही. “ स्वस्ति श्रीवटेश।जो लपोनि जगदाभासु । दावी मग ग्रासु। प्रगटला करी" (१), "प्रगटे तंव नंव. नादिसे लिपे तंव तंव आभासे। प्रगट ना लपाला असे । न खोमता जो (२)", "नुसचे मुख जसें । देखिजतसे दर्पणमिसें । वायांचि देखणे ऐसे । गमों लागे" (२०); “यालागि मोनेंचि बोलिने । कांही न होनि सर्व होइजे। नव्हतां लाहिजें । काहीच नाही" (3) * एका ज्ञानदेव चक्रपाणी, ऐसे ! दोन्द्वी डोळस आसिखे । परस्पर पाहता कैसे । मुकले