पान:संतवचनामृत.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भक्तांचे स्वरूप. सिंहाचे ते नख पतिव्रतेचे स्तन । गेलियाही प्राण हातां नये ॥ विराल्यावांचून देह अहंभाव । जनी म्हणे देव हातां नये ॥ ५. काया, वाचा, मन सद्गुरूस देऊन त्याजपासून वस्तु मागून घ्यावी. संसारीं निधान लाधले जना । सद्गुरुचरणा सेवी बापा ॥ कायावाचामने तयास देयावी । वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥ तें गोचर नव्हे जाण गुरुकृपवीण । एन्हवीं ते आपणामाजी आहे॥ माळ वेष्टण करीं टापार घेती शिरीं । नेम अष्टोत्तरी करिताती॥ जो माळ करविता वाचेसी वदविता । तया हृदयस्था नेणे कोणी सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट । सद्गुरु वरिष्ठ तोचि जाणा॥ तया उत्तीर्णता दहावया पदार्था । न देखो सर्वथा जनी म्हणे ॥ ६. इंगळाच्या खाईप्रमाणे, विषाच्या प्रासाप्रमाणे, अगर खड्गाच्या धारेप्रमाणे भक्ति कठीण आहे. भक्ति ते कठीण इंगळाची खाँई । रिघणे त्या डोही कठीण असे ॥ भक्ति ते कठीण विषमास घेणे । उदास पैं होणे जीवेभावें ॥ भक्ति ते कठीण भक्ति ते कठीण | खड्गाची धार बाण न सोसी . तया ॥ भक्ति ते कठीण विचारून पाहे जनी । भक्तियोगे संतसमागमीं सर्वसिद्धि ॥ । १ ठेवा. २ हातांत. ३ डोळ्याभोवती गुंडाळलेलें वन. ४ ऋणंतून मुक्तता. ५ निखारा. ६ खाच. ७ तरवार.