पान:संतवचनामृत.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जनाबाई. १. पतंगानें सुखावून दीपावर उडी घातली असतां . त्याचे सुखही जाईल व देहही जाईल. 'पतंग सुखावला भारी। उडी घाली दीपावरी ॥ परि तो देहांती मुकला । दोही पदार्थी नाडिला ॥ विषयाचे संगतीं । बहु गेले अधोगती ॥ ऐसे विषयाने भुलविले । जनी म्हणे वायां गेले ॥ २. देहांत असून छायापुरुषाप्रमाणे वर्तन करावें, सुखे संसार करावा । माजी विठ्ठल आठवावा ॥ असोनियां देहीं । छायापुरुष जैसा पाहीं॥ जैसा सूर्य घटाकाशीं । तैसी देही जनी दासी॥ ३. साधकाचे गुण. माक्रोशे ध्यानासी आणी पुरुषोत्तमा। पृथ्वीयेसीक्षमा उणी आणी॥ अखंडित शुद्ध असावे अंतर । लोणिया कठोर वाटे मनीं ॥ बोले ते वचन बहु हळुवट । सुमना अंगी दाट जडभार ॥ नाम ते स्मरण अमृतसंजीवनी । म्हणे दासी जनी हेचि करा॥ ४. अभिमानत्यागावांचून देव हाती येणार नाही. शूराचे ते शस्त्र कृपणाचे धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥ गजमाथां मोती सर्पाचा तो मान । गेलियांही प्राण हातां नये ॥ १ फसणे. २ हलके, कोमळ. ३ लोभी. ४ नाश करणे.