पान:संतवचनामृत.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ - - - - - संतवचनामृत : जनाबाई. [६ . • ७. घार पिलांवर झाभ घालते, त्याप्रमाणे आम्ही तुजवर - आसक्ति ठेवितो. पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा॥ घार हिंडते आकाशीं । झाप घाली पिल्लापाशीं॥ माता गुंतली कामासी । चित्त तिचे बाळापाशीं॥ वानर हिंडे झाडांवरी। पिली बांधुनी उदरीं॥ तैसी आम्हांसी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥ ८. दळत कांडत असतां नामयाची जनी देवाचे नाम घेते. नाम विठोबाचे घ्यावे । मग पाऊल टाकावें ॥ नाम तारक हे थोर । नामें तारिले अपार ॥ अजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ।। नाम दळणीं कांडणी । म्हणे नामयाची जनी॥ ९. गंगा सागराजवळ गेली असता त्याने तिचा अव्हेर र केला आहे काय ? . . . गंगा गेली सिंधूपाशीं । त्याणे अहेरिले तिसी ॥ तरी ते सांगावे कवणाला । ऐसे बोले बा विठ्ठला॥ जळ काय जळचरी। माता अव्हेरी लेकुरा॥ जनी म्हणे शरण आले । अव्हेरितां ब्रीद गेले॥ १०. विठया, तुझी रांड रंडकी होऊन ती जन्मसावित्रीच्या का चुडा ल्याली आहे. अरे विठ्या विठया । मूळ मायेच्या कारट्या ॥ तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्रीचुडाँ ल्याली। - १ सर्व पृर्वावर. २ तारणारें. ३ त्याग करणे. ४ मासे.५ प्रतिज्ञा, ६ बायको. ७ बांगडी, सौभाग्यचिन्ह.