पान:संतवचनामृत.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.] भाक्ति. ७. आमच्या घरास विठोबा पाहुणा आला असल्याने षड्रस पक्वान्न वाढून आम्ही त्याशी एकवट होऊन जेवू. विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें। पंचप्राण ज्योति ओवाळुनी आरती। ओवाळिला पति रखुमाईचा ॥ षड्रस पक्वान्न विस्तारिले ताट । जेवू एकवट चोखा म्हणे ॥ ८. विदुरद्रौपदीच्या घराप्रमाणे येथेही गोड करून जेवा असे चोखामेळ्याची म्हारी म्हणते. येई येई गरुडध्वजा । विटे सहित करीन पूजा ॥ धूपदीप पुष्पमाळा । तुज समर्पू गोपाळा ॥ पुढे ठेवोनियां पान । वाढी कुटुंबी ते अन्न ॥ तुम्हां योग्य नव्हे देवा । गोड करूनियां जेवा ॥ विदुराघरच्या पातळ कण्या। खासी मायबापा धन्या ॥ द्रौपदीच्या भाजीपाना । तृप्ति झाली नारायणा ॥ तैसी झाली येथे परी । म्हणे चोखयाची म्हारी॥ १बायको.