पान:संतवचनामृत.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६३ १४० संतवचनामृत: चोखामेळा. आकारले तितुके नासे । आत्मा आविनाश विठ्ठल दिसे ॥ ऐसा विठ्ठल हृदयीं ध्यायी । चोखामेळा जडला पायीं ॥ ४. चोखा डोंगा असला तरी त्याचा आत्मा काही डोंगा नाही. ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा॥ कमान डोंगी परी तीरे नाही डॉगा। काय भुललासी वरलिया रंगा॥ नदी डॉगी परी जळ नोहे डोंगे । काय भुललासी वरलिया रंगे॥ चोखाडोंगा परीभाव नाही डोंगा। काय भुललासी वरलियारंगा॥ ५. देणार असशील तर भक्तियुक्त कन्यापुत्र दे; नाही तर माझें निःसंतान कर. ऐसा पुत्र दे गा देवा । जग म्हणे त्याला बावा ॥ कन्या ऐसी तरी देई । जैसी मिरौं मुक्ताबाई ॥ ऐसा भक्तराज गुंडा । त्याचा तिहीं लोकी झेंडा ॥ इतके न देवे तुझ्याने । माझे करीं गा निःसंतान ॥ दोही माजी एक लेखा। बोले केशवदास चोखा ॥ ६. खटनटांनी येऊन येथून शुद्ध होऊन जावे अशी चोखामेळा दवंडी पिटितो. टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट ते चालावी पंढरीची ॥ हरिनाम गर्जतां नाहीं भयचिंता। ऐसे बोले गीता भागवत ॥ पातकाचे भार मिळाले अपार । जयजयकारे भरले भीमातीर॥ पंढरीचा हाट कवुलाची पर्ट 4 मिळाले चतुष्टं वारकरी ॥ बटनेंट यावे शुद्ध होउनी जावे । दवंडी पिटी भावे चोखामेळा ॥ १ वांकडा. २ बाण. ३ मिराबाई. ४ पताका, ५ बाजार. ६ पेठ. ७ चार. ८ वाईटसाईट.