पान:संतवचनामृत.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चोखामेळा. १. मला दूर हो, दूर हो, म्हणतात तर मी तुला कसा भेदूं ? हीन याति माझी देवा । कैसी घडेल तुझी सेवा ॥ मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीतीं ॥ माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥ माझ्या गोविंदा गोपाळा । करुणा भाकी चोखामेळा ॥ २. विठोबाचा हार तुझे कंठी कसा आला असे मला. बडवे विचारतात. धांव घाली विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिती ऐसा काही तरी अपराध ॥ विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला । शिव्या देउनी म्हणती महारा देव बाटवीला ॥ अहो जी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा। नका जी मोकलूं चक्रपाणी दुजे द्वारां ॥ जोडुनियां कर चोखा विनवितो देवा । बोलिला उत्तरी परि राग नसावा ॥ ३. मी देहांतच पंढरी पाहिल्याने अविनाश आत्मा विठ्ठलरूपाने मला दिसत आहे. देही देखिली पंढरी । आत्मा अविनाश विटेवरी॥ .. तो पहा पांडुरंग जाणा । शांति रुक्मिणी निजांगना॥ ___ १ हाकलणे. २ दुसऱ्या.