पान:संतवचनामृत.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत.. विशदाने असे त्यांचे म्हणणे आहे ( क. ४). भक्तियुक्त गोपालांचा शब्द कानावर पडल्याबरोबर देव त्यांस सामोरा येतो, असे सोनापदेव म्हणतात (क्र.) मुक्ताबाईंनी आपण अंध वायां जात असतांना निवृत्तिनाथांनी आपल्यास कसें सावध केले याचे वर्णन केले आहे (क्र. १). आम्ही या परमार्थनदीतून निवृत्तिमटाकाने गेल्याकारणाने आपल्या ध्येयास जाऊन पोचलों, असें मुक्ताबाई सांगतात ( क. २ ). आकाशांत मुंगी उडून तिने सूर्यास झांकून काकिलें, वांझ स्त्रीस देवरूपी पुत्र निर्माण झाला; शेषाने विचवास नमन केले; माशीएवढी आरति विऊन त्यांतून घार निर्माण झाली; व ते पाहून मुक्ताबाईस हंसें आले, असे त्या ... म्हपातात (क्र. ४). दिवसास चांदणे दिसून रात्री उष्णतेज पडल्याप्रमाणे वाटतें, आसे मुक्ताबाईनी म्हटले आहे (क्र. ५). चंद्रनाच्या वासाने वनांतील सर्व झाडे जशी सुवासिक व्हावीत, त्याप्रमाणे श्रीहरीची सेवा केली असतां मनुष्य हरिरूपच अनतो, असें मुक्ताबाईचे म्हणणे आहे (क्र. ६). १०. ज्ञानदेवादि चार भावंडांशी ज्यांचा अत्यंत संबंध आला असे पुरुष - म्हणजे चांगदेव हे होत. चांगदेव चौदाशे वर्षे जिवंत राहिले अशी जी एक समजून आहे तिचा अर्थ इतकाच की, एक तर चांगदेव या नांवाचे चौदा निरनिराळे पुरुष होऊन गेले, अगर निळोबांनी म्हटल्याप्रमाणे चांगदेव या नावाच्या व्यक्तीस चौदा निरनिराळी नांवे पडली. निळोबांनी एकाच व्यक्तीस चौदा निरनिराळी नांवें होती असे जे म्हटले आहे ते अशक्य दिसत नाही. आत्माराम या नावाच्या रामदासपंथांतील एका कवीने “दासविश्रामधाम" या नांवाचा जो एक ग्रंथ लिहिला आहे त्यांत प्रत्यक्ष रामदास यांस " विप्र, फकीरजिंदा, सामीरामदास" वगेरे निरनिराळी नांवें होती असे लिहिले आहे. एकंदरीत ही गोष्ट खरी आहे. की, चांगदेव या: नांवाचा जो प्रसिद्ध पुरुष होऊन गेला त्याचा जन्मशक माहीत नसला तरी त्याची समाधि गोदाबरीनदीवर पुणतांचे या गांवीं शके १२२७ मध्ये झाली. या चांगदेवाचा ज्ञानदेवादि चारी भावंडांशी जरी संबंध आला होता, तथापि त्यांतल्या त्यांत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांच्याशी न्याचा संबंध जास्त आला. चांगदेव व ज्ञानदेव यांचा संबंध म्हणजे हठयोग व राजयोग यांचा संबंधच होय. चांगदेव इठयोगांत फार निष्णात होता व त्याने पाठविलेल्या कोन्या कामदास उत्तर म्हणून ज्ञानदेवांनी "चांगदेवपासष्टी " या लांडावे पकसा ओलांचे एक पन्ना सन्यास पाठविले आहे. त्या पत्र्याच्या योगगर्ने