पान:संतवचनामृत.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विसोबाखेचर. १. देव देखिला म्हणसील तर, नामदेवा, हा बोल बरा नव्हे. जरी म्हणसी देव देखिला । तरी बोल भला नव्हे नाम्या । जावरि मी माझे न तुटे । तंव आत्माराम कैसेनि भेटे॥ खेचरसाह्याने मी काही नेणे । जीवाया जीव इतले मी जाणे ॥ २. तुझें निजसुख तुझ्यापाशीच आहे. तुझे निजसुख तुजपासी आहे। विचारूनि पाहे मनामाजी ॥ विवेकवैराग्य शोधूनियां पाहे । तेणे तुज होय ब्रह्मप्राप्ति ॥ ज्ञानाचा प्रकार सहजचि झाला । आहे भाव गेला गळोनियां ॥ खेचर विसाम्हणे जेथे ओंकार निमाला सहजचि झाला ब्रह्ममूर्ति। ३. असा अनकळित मार्ग तुला साधेल तर पर्वतप्राय पापराशि दग्ध होतील. पर्वतप्राय पापराशि होती दग्ध । वाचेसी मुकुंद उच्चारितां ॥ अच्युत हरे केशव हरे । माधव हरे रामकृष्ण ॥ नामाचे साधन करिशील पूर्ण । तें प्रपंचभान उरों नेदी ॥ उदासीनवृत्ति आवरावे मन । नाहीं गुणधर्म मायालोभ ॥ ऐसा अनकळित मार्ग साधेल जरी तुज। खेचर विसा गुज सांगें नाम्या॥ - १ इतके. २ समन.