पान:संतवचनामृत.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ संतवचनामृत : गोराकुंभार. [$r नलिंपेचि कर्मी न लिंपेचि की। न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ।। म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त । सुखरूप अद्वैत नामदेवा ॥ ५. मन हे मुकें होऊन नेत्रपाती निवांत राहिली आहेत. कवण स्तुति करूं कवणिया वाचे। वोध संकल्पाचे गिळिलें चित्त। मन हे झाले मुके मन हे झाले मुके । अनुभवाचे हे सुख हेलावले। दृष्टीचे पाहणे परतले मागुती। राहिली निवांत नेत्रपाती । म्हणे गोरा कुंभार मौन्यसुख ध्यावे । जीवें ओवाळावे नामयास। ६. आपण जीवन्मुक्त होऊन जगास शाहणें न करणे हे बरें. मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतां हे बोली बोलवेना। ते काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधारा या ॥ आनंदी आनंद गिळुनी राहणे । अखंडित होणे न होनियां ॥ म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणे । जग हे न करणे शहाणे बापा। १डोलणे. २ पापण्या.