पान:संतवचनामृत.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ संतवचनामृत: विसोबाखेचर. [४ ४. खेचराचे गुरु ज्ञानराज, व खेचराचे शिष्य नामदेव. जळ स्थळ काष्ठ पाषाणु । पिंडब्रह्मांड अणुरेणु । सर्वस्वे आपणु । साक्ष असें॥ हे जाणूनियां यापरतें । जाणे आप आपणियाते।। खेचर म्हणे नामयाते । अवघाचि देव ॥ श्रवणी सांगितली मात । मस्तकी ठेविला हात। पदपिंडविवर्जित । केला नामा॥ खेचर विसा । प्रेमाचा हो पिसा। नामा कैसा । उपदेशिला ॥ सांगितले गुज । दाखविले निज। पाल्हाळी हो तुज । काय चाड ॥ खेचर म्हणे मज । ज्ञानराज हे गुरु । तेणे अगोचरु । नामा हा केला ॥ १ ब्रह्म व जीव. २ या वेगळा. विस्तार.