पान:संतवचनामृत.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोराकुंभार. १. नाम्या, तुम्हां आम्हां यावर तुटी उरली नाही. स्थूल होते तेंचि सूक्ष्म पैं झालें । मन हे बुडाले महासुखीं॥ माझे रूप माझे विरालेसे डोळां । सामाविले बुबुळां माझे शान ॥ म्हणे गोरा कुंभार नवल जाहली भेटी । नाम्या तुम्हां आम्हां तुटी व उरली नाहीं॥ २. पाहता पाहतां माझी खेचरी मुद्रा लागून गेली. निर्गुणाचे भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगें गुणातीत ॥ मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला काई बाई बोलूं नये ॥ बोलतां आपुली जिन्हापै खादली खेचरी लागली पाहता पाहतां॥ म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझीभेटी।सुखासुखी मिठी पडली कैसी॥ ३. जयजय झनकून झांगट वाजते. अंतरींचे गुज बोलूं ऐसे कांहीं । वर्ण व्यक्ति नाही शब्द शून्य ॥ जय जय झनकून जयजय झनकून । अनुहात जंगटे नाद गर्जे ॥ परतल्या श्रुति म्हणती नेति नेति। त्याही नादाअंतीस्थिर राहती॥ म्हणे गोरा कुंभार सत्रावीचे नीर । सेवी निरंतर नामदेवा ॥ ४. मजवर झडपणी होऊन आदिरूप मनांत संचरलें आहे. केशवाचे भेटी लागले ते पिसे । विसरले कैसे देहभाव ॥ झाली झडपणी झाली झडपणी। संचरलें मनी आदिरूप ॥ - १ मावणे. २ भेद. ३ एक मुद्रा. ४ गुप्त गोष्ट. ५ काशाचे एक वाद्य. ६ वेद, ७ अमृत, ८ वेड. ९ भूताने पछाडले जाणे.