पान:संतवचनामृत.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६१४८ संतवचनामृत : नामदेव. दाही दिशा व्यापूनियां तो अंधःकार महा रे। रविप्रकाश जाहल्या आपेआप निरसला रे॥ काष्ठी पावक उपजला तोही तयासम रे । नामा म्हणे केशिराजा चेईल्या आम्हां तुम्ही रे॥ - १४९. उन्मन्यवस्थेत स्वरूपसाक्षात्कार. देहमंदिराभीतरी । शेजे सूदला श्रीहरि ॥ निद्रा उन्मनीचे भरीं । तें म्यां स्वम देखिलें। स्वी भुलले बाई । मागील नाठवेचि काई ॥ हा जीव परवस्तूच्या ठाई । तनुमने आटला ॥ स्वम सांगू कोणासी । विवेक करिती तयासी ॥ है कोडे अजानासी । संतावांचुनी नुगवे ॥ ध्यानी पहुडला सांवळा । जवळी नारी बारा सोळा ।। विजणे वारिती सकळां । सोहंशब्दजागरणी । धिं धिं तुरे वाजती । अनुहात ध्वनि गर्जती ॥ तेथे निद्रा ना सुषुप्ति । चंद्रसूर्य मावळले ॥ .मना पवना नाही भद । तया ठायीं हा गोविंद । तेथे खुंटला अनुवाद । वेदश्रुति आटल्या ॥ म्हणे विष्णुदास नामा। जन्ममरण नाहीं आम्हां । कृपा केली मेघश्यामा । संतसंगे तारिलो॥ १५० "केशव तोचि नामा, नामा तौच केशव." नामयाचे प्रेम केशवाचे जाणे । केशवासी राहणे नाम्यापाशीं ॥ केशव तोचि नामा नामा तोचि केशव प्रेमभक्तिभाव मागतसे। विष्णुदास नामा उभा केशवद्वारी । प्रेमाची शिदोरी मागतसे ॥ १ घालणे. २ निजणें. ३ पंखा.